आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:एकाचवेळी 40 झाडे लावून‎ घेतली संगोपनाची प्रतिज्ञा‎; घराच्या‎ परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन

शहर प्रतिनिधी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा‎ सिडबॉल कॅम्पेन २०२२ च्या अमृत‎ महोत्सवानिमित्त विशेष वृक्षरोपण आणि‎ संगोपण अभियान राबवले जात आहे.‎ त्यानुसार पारोळा येथील डॉ.महेश पवार‎ यांनी जन्मदिवसाचे औचत्य साधून ४०‎ झाडे लावली. तसेच या झाडांचे संगोपन‎ करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.‎ त्यांनी आपल्या कासोदा गावातील मंत्री‎ कन्या शाळेत हा उपक्रम राबवला.

एक‎ गावकरी म्हणून त्यांनी इतरांनादेखील‎ वृक्षरोपणाचे महत्त्व सांगितले. निसर्गाप्रती‎ कृतीतून गावाची सेवा करण्याची संधी‎ वृक्षारोपणातून मिळते. त्यामुळे‎ पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या घराच्या‎ परिसरात वृक्षारोपण करावे, असे आवाहन‎ त्यांनी केले. वृक्षांप्रती विद्यार्थ्यांमध्ये‎ जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने‎ शाळेतील विद्यार्थी वृक्षमित्र म्हणून‎ निवडण्यात आले आहेत. या उपक्रमा‎ दरम्यान अमृत महोत्सव समिती अध्यक्ष‎ डॉ.संभाजीराजे पाटील, रवींद्र पाटील,‎ आकाश बडगुजर, रवींद्र निकम हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...