आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ति:संदीपकुमार साळुंखे यांची आयकर आयुक्तपदी पदोन्नती

अमळनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मारवड येथील मूळ रहिवासी असलेले तथा पुणे येथील अतिरिक्त आयकर आयुक्त संदीपकुमार रतन साळुंखे यांची आयकर आयुक्त या पदावर पदोन्नती झाली आहे. २००४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची सहायक आयकर आयुक्त पदावर नियुक्ति झाली.

त्यांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी काम यशस्वीरीत्या सांभाळले. त्यांना चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स (पुणे) यांच्याकडूनही तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी धडपडणाऱ्या तरुणाईसाठी, उठा, जागे व्हा, अंतरीचा दिवा ही पुस्तके लिहिली आहेत. मारवड येथील मूळ रहिवासी असून आपल्या मातृभूमीशी नाळ जुळवत त्यांनी रूट संकल्पना ग्रामीण भागात राबवली आहे. त्यांनी मारवड परिसर विकास मंच ची स्थापना करून अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुप, मारवड तसेच परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे काैतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...