आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:योग्य मार्गदर्शन, मेहनत, अभ्यास हेच यशाचे गमक; पोलिस निरीक्षक उतेकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी दररोज मैदानावर मेहनत व सराव, मैदानी खेळ, ग्रुप समन्वयन, ठरवलेले ध्येयासाठी वेळेचे नियोजन व व्यवस्थापन यांचे मिश्रण, तसेच न थकता उद्दिष्टासाठी प्रेरित होऊन चिंतन केले तरच यश मिळते, असे प्रतिपादन पाेलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी केले.

तीन दिवसीय मोफत पोलिस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षांसह पोलिस कर्मचारी राजू पाटील, र. ना. देशमुख महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. दिनेश तांदळे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून कोळी महासंघाचे भडगाव अध्यक्ष अण्णा रघुनाथ कोळी, रासपचे भडगाव अध्यक्ष प्रा. सुरेश कोळी, सचिन नेवरे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक उतेकर यांचे स्वागत डी. बी. कोळी यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी पाटील हिने तर डी. बी. कोळी यांनी आभार मानले. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल, तर अभ्यासात स्वतःला झोकून दिले पाहिजे. तसेच स्वतः नोट्स काढून रिव्हिजन केल्यास लक्षात राहण्याची क्षमता वाढते, असा स्वत: अनुभव सांगून उतेकर यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

बातम्या आणखी आहेत...