आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:पुरवठा निरीक्षकांवरील कार्यवाहीसाठी प्रस्ताव ; प्रमाणीकरण प्रकिया पूर्ण केली नसल्याचा ठपका

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्त धान्य गैरव्यवहार होत असल्याच्या छायाचित्रणाने जामनेरचा पुरवठा निरीक्षक विठ्ठल काकडे अडचणीत आले. याबाबत तहसीलदार अरूण शेवाळे यांनी संबंधित दुकानदार व पुरवठा निरीक्षक काकडे यांना नोटीस बजावून खुलासा मागवला. त्यावरून प्रमाणीकरणासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचे स्पष्ट झाल्याने पुरवठा निरीक्षक काकडे यांच्यावर योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तहसीलदार शेवाळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. शेंदुर्णी येथील स्वस्त धान्य दुकानदारांना पाठवीलेल्या रिक्षातून दौन गोण्या पाठविण्याचे निर्देश पुरवठा निरिक्षक विठ्ठल काकडे यांनी सात दुकानदारांना दिले होते. रिक्षात गोण्या टाकतांनाच्या छायाचित्रणासह शेंदुर्णी येथील रविंद्र पवार या तरूणाने तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत दिव्य मराठीच्या वृत्तमालीकेची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुरवठा निरीक्षकांवरील कार्यवाहीसाठी तहसीलदार अरूण शेवाळे यांना चौकशीच्या सुचना केल्या होत्या. त्यावरून तहसिलदार शेवाळे यांनी संबंधीत सात दुकानदार व पुरवठा निरिक्षक काकडे यांना नोटीस बजाऊन खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी संबंधीतांनी खुलासा सादर केला असून सदरचे धान्य हे प्रमाणीकरणासाठी देण्यात आल्याचे दुकानदार व पुरवठा निरिक्षकांच्या जबाबावरून दिसून येत असले तरी कायदेशी प्रक्रीया पुर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुरवठा निरिक्षक विठ्ठल काकडे यांचेवर याग्य त्या कार्यवाहीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणार असल्याची माहिती तहसिलदार शेवाळे यांनी दिव्य मराठीला दिली. अहवाल पाठवणार प्राप्त झालेल्या जबाबावरून संबंधीत दुकानदारांनी पुरवठा निरिक्षकांकडे धान्य प्रमाणीकरणाची विनंती केलेली दिसून येते. ते करण्यासाठी तहिसलदारांची पुर्वपरवाणगी घेणे आवश्यक होते. ती न घेता पुरवठा निरिक्षक यांनी परस्पर निर्णय घेतला. याप्रकरणी संबंधीतांचे जाबजबाब व माझा स्वयंस्पष्ट अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उद्या पाठवणार आहे, असे तहसीलदार अरूण शेवाळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...