आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव द्या:‘प्रताप’च्या प्राध्यापिकेची मान्यता रद्द करुन प्रस्ताव द्या ; शिक्षण उपसंचालकांनी महाविद्यालयास दिले पत्र

अमळनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापिकेची मान्यता रद्द करून प्रस्ताव पाठवा, असे पत्र शिक्षण उपसंचालकांनी महाविद्यालयास १४ रोजी दिले आहे. यामुळे अमळनेरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या प्रताप महाविद्यालयात सेवेत असलेल्या प्रा. प्रतिभा बाबुराव पाटील यांच्याबाबत तक्रारदार लोटन चौधरी व दिलीप जैन यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक विभागाची राज्य माध्यमिक मंडळ समितीची बैठक झाली. यात २५ एप्रिल रोजी सुनावणी होऊन त्यात प्रा. पाटील या राणी लक्ष्मीबाई विद्यालयात कायम शिक्षिका पदावर कार्यरत होत्या. त्या बदलीने प्रताप महाविद्यालयात अनुदानित पदावर आल्या. ही बाब नियमबाह्य ठरवण्यात आली. सोबतच १७ अधिक एक अशा एकूण १८ बोगस शिक्षक भरतीची ना हरकत मिळवल्याने, त्यांची मान्यता रद्द झाली. त्यामुळे लोटन चौधरी यांनी याचिका क्र १०३०३/२०१७ दाखल केली होती. या प्रकरणाचा निपटारा तीन महिन्याच्या आत करावा असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु आदेशानुसार कार्यवाही न झाल्याने, न्यायालयाचा अवमान झाला होता. त्यामुळे तक्रारदार लोटन चौधरी यांनी तक्रार निवारण समितीकडे बेकायदेशीर बदली रद्द करून आतापर्यंत घेतलेला पगार शासनाच्या तिजोरीत जमा करावा, अशी मागणी केली होती. याबाबत आवश्यक कागदपत्रे तपासून शिक्षण उपसंचालकांनी पत्र दिले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...