आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी रद्द केल्याचा निषेध

चाळीसगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा व छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी, महाविकास आघाडी सरकारने विकास निधी मंजूर केला होता. हा मंजूर निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-देवेंद्रजी फडणवीस यांनी रद्द केला. त्यामुळे २ रोजी तहसीलदारांना निवेदन देत मराठा सेवा संघाने या निर्णयाचा निषेध नोंदवला. हा निधी पुन्हा मंजूर करत शिवप्रेमीनां न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वढू बुद्रूक ता.हवेली जि.पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २६५ कोटी रुपये विकास निधी महाविकास आघाडीने मंजूर केला होता. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या सुशोभिकरणाचा १० कोटी रुपयांचा निधीही सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे स्मारकांचा विकास आराखडा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

बातम्या आणखी आहेत...