आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसीय धरणे आंदोलन:पाचोरा शहरात विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंटतर्फे धरणे आंदोलन

पाचोरा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एलआयसी शाखेत विमा धारक व एलआयसी एजंट यांनी विविध मागण्यांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. यानिमित्त दिवसभरात एकही नवीन प्रस्ताव व जुन्या पॉलिसीचे हप्ता भरणे बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला.या आंदाेलनात ज्येष्ठ एलआयसी एजंट प्रा. रमाकांत शर्मा, प्रकाश पाटील, एम. डी. पाटील, नितीन मोराणकर, विनायक दिवटे, सुनील पाटील, सुनील देवरे, विजय पाटील, अनिल कोतकर, सुजित तिवारी, अरुण पाटील, देविदास कोळी यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील एजंट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विमा प्रतिनिधींनी विमा धारकांसाठी विमा धारकांचे बोनस वाढवावे, कर्ज व इतर देवाण घेवाण करताना त्यावरील व्याजदर कमी करावा, पाच वर्षे बंद असलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची पद्धत सुरू करावी, गरीब व अशिक्षित आणि तळागाळातील विमा धारकांकडून केवायसी घेणे सक्तीचे करु नये, याशिवाय विमा प्रतिनिधींसाठी ग्रॉज्युटी वाढवून २० लाख करावी, सर्व प्रतिनिधींसाठी मोफत उपचारासाठीची योजना सुरू करावी, विमा प्रतिनिधींसाठी टर्म इन्शुरन्स वाढवून द्यावा, अंशदायी पेन्शन व अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना सुरू करावी, यासह अनेक मागण्यांसाठी घोषणाबाजी करुन एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...