आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक मदत:आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्याला केली आर्थिक मदत

अमळनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा सातवीचा विद्यार्थी ओम वाल्मीक हटकर याचे वडील वाल्मीक बळीराम हटकर- पाटील यांचे फेब्रुवारी महिन्यात क्षयरोगाने निधन तर आई मनीषा वाल्मीक हटकर-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते दुई (ता.मुक्ताईनगर) येथील रहिवासी आहेत. मातृ पितृ छत्र हरपलेल्या ओम व जय या दोन्ही मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी येथील शिवशाही फाउंडेशनने मदतीचे आवाहन केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक दानशूर पुढे आले आहेत

शिकण्याची जिद्द व चिकाटी पाहून एका व्यक्तीने सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ओमच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. दानशूर व्यक्तींमध्ये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील (शहादा), सहायक पोलिस निरीक्षक गोपीचंद नेरकर (नागपूर), अमळनेर तहसीलचे दत्तात्रय सैंदाणे, सुशील भदाणे, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, मुख्याध्यापक मनोहर मगर, साने गुरुजी पतपेढीचे संचालक जे. एस. पाटील, गणित मंडळाचे तालुकाध्यक्ष डी. ए. धनगर, सेना शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर चौधरी व जिल्हा आदर्श शिक्षिका मनीषा चौधरी यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...