आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पंजाब मेल; विदर्भला पाचोरा येथे थांबा द्यावा

पाचोरा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्थानकावर पंजाब मेल आणि विदर्भ एक्सप्रेसला थांबा मिळावा, भुसावळ-मुंबई पॅसेंजर सुरू करावी, या मागणीसाठी रेल्वे प्रवासी कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संदर्भात कृती समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. सायंकाळी ६ नंतर पाचोऱ्याहुन मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे नाही.

त्यामुळे पंजाब मेल आणि विदर्भ एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, बंद झालेली भुसावळ - मुंबई पॅसेंजर सुरु करावी, पाचोरा स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढली, परंतु वाढीव प्लॅटफॉर्मवर शेड, कोच इंडिकेटर नाही, ते उभारावे, अशा मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, विलास जोशी, अॅड. अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, प्रा. गणेश पाटील, संजय जडे, पप्पू राजपुत, रणजित पाटील, विकास वाघ, मंगेश पाटील, मिलिंद सोनवणे, कांतीलाल जैन, प्रभुराम पाटील, प्रा.मनिष बाविस्कर, नीलेश कोटेचा, शाहबाज बागवान, अॅड. अण्णा भोईटे, एकनाथ संदनशिव, जगदीश पटवारी, रमेश शामनाणी, अनिल येवले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...