आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लाचखोर हवालदारासह पंटर एसीबीच्या जाळ्यात ; तक्रारदाराला बोलावून रचण्यात आला सापळा

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही. उलट तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. यानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यातील हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजारांची लाच मागितली. मंगळवारी लाच स्विकारताना लाचखोर हवालदाराचा पंटर असलेल्या चहा विक्रेत्याला जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. नंतर हवालदार राकेश खोंडे यालाही ताब्यात घेतले.

तक्रारदाराकडे चार हजारांची तडजोड झाली. मात्र, तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावून सापळा रचण्यात आला. एका चहा विक्रेत्याकडे लाचेची रक्कम देण्याचा निरोप लाचखोराने दिला होता. त्यामुळे पथकाने आधी पाटील नामक चहा विक्रेत्याला व नंतर हवालदार राकेश खोंडे याला अटक केली. विशेष म्हणजे संशयित खोंडे त्यावेळी रजेवर होता. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...