आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रा. दीपक शुक्ल हे निवृत्त असून त्यांनी आतापर्यंत शिबिरात १३२ वेळा रक्तदान करून रेकॉर्ड ब्रेक केले आहे. रक्तदान मोहिमेच्या प्रसाराला स्वतःचे संपूर्ण जीवनच अर्पण करून त्यांनी समाजात मोठी जनजागृती करत रक्तदानाची सेंच्युरी केली आहे. त्याअनुषंगाने १४ जून रोजी त्यांचा मुंबई येथील राज्य रक्त संक्रमण परिषदेत त्यांचा सन्मान होणार आहे. प्रा. दीपक शुक्ल यांना या संदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांच्या स्वाक्षरीने पत्र प्राप्त झाले आहे. हा कार्यक्रम मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी ३ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यांची उपस्थिती राहणार आहे. अशी केली रक्तदानाला सुरुवात प्रा. दीपक शुक्ल यांच्या कुटुंबात ही अनेकांनी रक्तदान केले आहे. ते सन १९८९ साली राष्ट्रीय विद्यालयात नोकरीला लागले होते. त्यावेळी त्याच कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी अचानकपणे ट्रॅक्टरच्या मागील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याला रक्ताची माेठी गरज होती. त्यावेळी सर्वप्रथम दीपक शुक्ल यांनी रक्तदान केले होते. त्यानंतर अनेकांना रक्तदान करण्याचे आवाहन करुन त्या विद्यार्थ्याचा जीव वाचवला होता. त्यानंतर त्यांचे रक्तदानाचे कार्य सुरु झाले. दरम्यान, शुक्ल यांचा चुलत भाऊ ऋषभ शुक्ल याला २००३मध्ये डेंग्यू झाला होता. त्यावेळी त्याला बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. त्या वेळीही रक्तदान करुन त्याचा जीव वाचवल्याचे प्रा. दीपक शुक्ल यांनी सांगितले. ऋषभ हा सध्या चाळीसगावात सिव्हिल इंजिनिअर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.