आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:लाेहारा येथील शिक्षकांचा गुणगाैरव

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील लाेहारा येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त लोहारा शहर पत्रकार मंचतर्फे गावातील सर्व शाळांमधील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद मराठी मुलांच्या केंद्र शाळेत झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे महेंद्र शेळके व पत्रकारांनी पूजन केले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे होते. सूत्रसंचालन पत्रकार दीपक पवार यांनी केले. या वेळी पत्रकारांनी मुख्याध्यापिका ज्योती बारी, शिक्षक शंकर गायकवाड, अंकुश भुत्ते, मुकुंद वारांगणे, सुनीता सुपलकर यांचा सत्कार केला.

शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सुनील खरे यांनी सत्कार केला. सुनील खरे व शिक्षक शंकर गायकवाड यांनी आभार मानले. जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख इस्माईल, शिक्षक जफर शेख, बुशराबी या शिक्षकांचा पत्रकारांनी सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका उषा साळी, शिक्षक गजानन काटे, कृष्णा तपोने, दिनेश तेली यांचा सत्कार केला. डॉ. पंडित विद्यालयात मुख्याध्यापक आर. एस. परदेशी, उज्ज्वला शेळके व सर्व शिक्षकांचा पत्रकारांतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकार मंचचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत, महेंद्र शेळके, कृष्णराव शेळके, दिलीप चौधरी, ईश्वर खरे,अतुल माळी, गजानन क्षीरसागर हजर होते.

बातम्या आणखी आहेत...