आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधा जन्माेत्सव:ऋषिपांथा येथे कीर्तन साेहळ्यात रंगले भाविक कृष्ण जन्माष्टमी इतकेच राधा अष्टमीचे महत्त्व  ; दत्तात्रय महाराज​​​​​​​

बहाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळ असलेल्या ऋषिपांथा येथे शनिवारी सकाळी १० ते १२ या दरम्यान राधा जन्मोत्सव माेठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त दत्तात्रय महाराज वृंदावनकर यांच्या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनातून राधेच्या जन्माविषयी माहिती सांगण्यात आली. राधेचा जन्म बरसाना, जि.मथुरा येथे झाला. यासह श्रीकृष्ण यांच्याविषयी माहिती सांगत राधा अष्टमी हे व्रत केल्याने एक हजार एकादशी केल्याचे फळ मिळते, एवढेे या व्रताचे महत्त्व असल्याचे दत्तात्रय महाराजांनी कीर्तनातून सांगितले. भाविकांनी या साेहळ्याचा आनंद घेतला.

जेव्हा जेव्हा श्री कृष्णाचे नाव घेतले जाते, तेव्हा राधाचे नाव आपोआप घेतले जाते. ही दोन नावे कायमची जोडली गेली आहेत. कृष्ण जन्माष्टमीनंतर फक्त १५ दिवसांनी राधा अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद अष्टमीच्या दिवशी राधा अष्टमी साजरी केली जाते. यंदा राधा अष्टमी शनिवारी रोजी साजरी करण्यात आली. असे मानले जाते की राधा राणी शिवाय श्री कृष्णाची पूजा अपूर्ण राहते. त्यामुळे जेव्हा जेव्हा भगवान श्री कृष्णाचे नाव घेतले जाते, तेव्हा राधा राणीचे नाव एकत्र घेतले जाते. कृष्ण जन्माष्टमीप्रमाणे राधा अष्टमीही मथुरा, वृंदावन आणि बरसाना येथे मोठ्या थाटात साजरी केली जाते. त्याचप्रमाणे ऋषिपांथा येथेही साजरी करण्यात आली. कीर्तनास वाडे, गुढे, बोरखेडा, चाळीसगाव, जामदा, भडगाव, पाचोरा, धुळे, ढोमणे कोळगाव, मेहुणबारे, औरंगाबाद, नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील हजाराे भाविक उपस्थित हाेते.

या वेळी पांडुरंग महाराज देवळी, अशोक महाराज नांदगाव, कैलास महाराज टेकवाडे, चित्ते महाराज वाडे, बारकू महाराज, वडाळे, तुकाराम महाराज, पप्पू महाराज गुढे, श्री १००८ परमेश्वरानंद महाराज, मुंबई, नामदेव महाराज, पोहरे, अशोक महाराज, आदिनाथ महाराज, नांदगाव, सुकदेव महाराज, पिंप्राळा, भरत महाराज, वाडे, गोरख महाराज, न्हावे, रघुनाथ महाराज, बहाळ, दादाभाऊ महाराज भऊरकर आदी कीर्तनकार महाराजांची उपस्थिती होती. तसेच बहाळ, गुढे, पोहरे, भऊर, मेहुणबारे, वाडे, टेकवाडे, बोरखेडा, तरवाडे, खरजई, चाळीसगाव येथील टाळकरी उपस्थित होते. यावेळी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. या जन्मोत्सव साेहळ्याचे आयोजन हभप धनंजय महाराज यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...