आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पुरनाड फाट्यावरील सर्रासपणे अवैधरित्या सुरू असलेल्या पत्ता जुगाराच्या अड्ड्यावर जळगावच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह येथील पोलिसांच्या पथकाने छापा टाकून साडे तेरा लाखांचा ऐवज जप्त केला. तसेच १५ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही धाडसी कारवाई सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंथा, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक शंकर शेळके व पोलिसांच्या उपस्थितीत तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील अवैधरीत्या सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर धाड टाकण्यात आली. यात जुगारी झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. या छाप्यात जुगार खेळणाऱ्यांकडून १ लाख ७० हजार २२० रुपयांच्या रोकडसह तीन चारचाकी, दोन दुचाकी, १३ स्मार्टफोन, पत्त्यांच्या कॅटसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली. त्याचे एकूण मूल्य १३ लाख ५२ हजार २२० रूपये इतके आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस पथकाने संजय गजमल मराठे (वय ३९, रा पुर्णाड), गजानन भीमराव सोनवणे (वय ५९, रा. मुक्ताईनगर), संतोष नथ्थू खुरपडे (वय ३३, रा. मुक्ताईनगर), कैलास वासुदेव जाधव (वय ३८, रा.वडोदा, ता. मुक्ताईनगर), विजय नारायण परगरमोर (वय ४२, रा.शेगाव), मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहीर (वय ३७, रा. शेगाव), रवींद्र सदाशिव शिरोडकर (वडोदा), मोहम्मद मोहसीन खान (वय ४०), गजानन मनोहर शंखे (वय ४०, रा. शेगाव), महादेव धनसिंग राठोड (वय ४१, रा.कान्हेरी गवळी, ता. बाळापूर, जि. अकोला), सीताराम प्रल्हाद पारसकर (वय ५२, रा.भोटा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा), अनिल नामदेव कोळी (वय ५०, रा. टहाकळी), राजेश सीताराम वाकोडे (वय ५०, रा.नांदुरा), सुरेश रामदास लोखंडे (वय २९, रा.वडोदा), जितेंद्र सुभाष पाटील (रा. विटवा, ता.रावेर) या १५ संशयितांना ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.