आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:उद्यापासून चार दिवस पाऊस, जिल्ह्यात कमी होणार थंडी

अमळनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १० डिसेंबर हा यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस ठरला. कारण, ८.५ अंश तापमान नोंदवले गेले. दरम्यान, रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.

शिवाय सोमवारपासून पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडी कमी हाेऊन पुन्हा तापमान वाढू शकते. हिमालयाजवळील राज्यांमध्ये बर्फवृष्टी हाेत असल्याने उत्तरेतून थंड वारे वाहत आहे. तर समुद्रातील वादळामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण आहे.

दिवसाही गारठा वाढला
शनिवारी किमान तापमान ८.५ अंशावर असल्याने रात्री प्रचंड गारठा हाेता. वाऱ्याचा वेग ताशी १२ ते १४ किमी असल्याने गारठा अधिक वाढला हाेता.

वातावरण ढगाळ असल्याने किमान तापमानात काहीशी वाढ हाेवून थंडी कमी हाेऊ शकते. वाऱ्याचा वेग कमी असला तरी देखील शनिवारी जिल्हाभरात बाेचरी थंडी जाणवली.

पूर्व किनारपट्टक्षवर धडकलेल्या वादळाने उत्तर महाराष्ट्रात ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस हाेऊ शकताे. तुरळक ठिकाणी हा पाऊस हाेईल.

रात्रीसह दिवसाचे तापमान ३१ अंशावरून घसरून २९ अंशांवर आले. सकाळी ११ वाजेपर्यंत व दुपारी चारनंतर वातावरणात गारठा वाढल्याचे जाणवले.

बातम्या आणखी आहेत...