आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण सोडत:चाळीसागावात राजीव देशमुख, विजया पवार, शंकर पोळ, सूर्यकांत ठाकुरांची ‘प्रभाग कोंडी’ ; सोयीचा प्रभाग गेला

चाळीसगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका निवडणुकीसाठी सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामुळे अनेकांची प्रभाग कोंडी झाली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे १८ प्रभागातील ३६ पैकी १८ जागा महिलांच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे माजी दिग्गज नगरसेवक आणि इच्छुकांना एकतर प्रभाग बदलावा लागेल अथवा कुटुंबातील महिलेला उमेदवारी द्यावी लागेल. तसेच सर्वसाधारण गटात निवडणूक लढवण्यास आता अनेक इच्छुक असल्यामुळे भाऊगर्दी वाढणार असून खरी चुरस याच गटात राहणार आहे. माजी आमदार राजीव देशमुख, माजी नगरसेविका विजया प्रकाश पवार, शंकर पोळ, सूर्यकांत ठाकूर, अरुण महिले, रामचंद्र जाधव यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने, त्यांना इतर प्रभागातून लढावे लागेल प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता पालिका निवडणुकीसाठी नगरसेवकपदाची आरक्षण सोडत पालिका सभागृहात काढण्यात आली. यावेळी उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे, सभा अधीक्षक विजय खरात, संगणक अभियंता महेश शिंदे, कर निरिक्षक राहुल सांळुखे, आरोग्य निरिक्षक सचनि निकुंभ उपस्थित होते. सर्वप्रथम अनुसूचीत जातीच्या महिला वर्गांच्या २ जागांसाठी प्रभाग क्र. १, ४, ८ व १३ या चार प्रभागांची सोडत काढण्यात आली. त्यात १ अ व ८ अ या दोन जागा निघाल्या. चाळीसागाव शहरात राजीव देशमुख, विजया पवार, शंकर पोळ, सूर्यकांत ठाकूर यांची ‘प्रभाग कोंडी’ त्यानंतर प्रभाग क्र. १७ तील एक जागा अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी आरक्षित झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेली आरक्षण सोडत २० मिनिटात आटोपली. सर्वसाधरण गटाच्या १६ जागांसाठी चुरस : १८ प्रभागांमधील एकूण ३६ पैकी दोन जागा एससी महिलांसाठी, तर एक जागा एसटी महिलेसाठी अशा एकूण तीन, तर १५ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. त्याचप्रमाणे एकूण एससी उमेदवारांसाठी दोन जागा राखीव आहेत. एसटी व एससी प्रवर्गासाठी आरक्षित पाच, सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित १५ अशा एकूण २० जागा या आरक्षणांतर्गत राखीव असल्याने ३६ पैकी १६ जागा, सर्वसाधारण गटासाठी उरतात. यंदा निवडणुकीत याच १६ जागांवर सर्वच माजी नगरसेवक व इच्छुकांच्या उड्या पडणार आहेत. गेल्यावेळी ९ जागा ओबींसींसाठी राखीव होत्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिलांसाठीच्या आरक्षणांची चिठ्ठी काढण्यात आली. थेट पध्दतीने १५ महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...