आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा:मेहुणबारेत विद्यार्थिनींचा ‘राखी विथ खाकी’ उपक्रम ; पोलिसांनी केले कौतुक

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी राखी विथ खाकी हा उपक्रम राबवला. मेहुणबारे परिक्षेत्रातील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या मोहिमेच्या जनजागृतीसाठी मेहुणबारे गावात प्रभात फेरी काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीचा घोषणा देण्यात आल्या. रक्षाबंधन कार्यक्रमाला एपीआय विष्णू आव्हाड यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांकडून विद्यार्थिनींना अल्पोपाहार व भेट म्हणून पेन देण्यात आला. पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली. या अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, संस्थेचे सचिव विजय बोरसे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाचे पोलिसांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...