आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:पर्यावरण जनजागृतीसाठी अश्वमेध स्कूलतर्फे रॅली ; रस्त्यालगत 150 झाडे लावण्याची सुरुवात

चाळीसगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्वमेध पब्लिक स्कूल शाळेकडून टाकळी प्र.दे. येथे पर्यावरण दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची गावात पर्यावरण जनजागृतीसाठी घोषवाक्य देत रॅली काढण्यात आली. तसेच शाळेच्या संस्थापिका अश्विनी सुभाष पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून टाकळी ते अश्वमेध शाळेच्या रस्त्यालगत १५० झाडे लावण्याची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात गावातील नागरिकांनी देखील सहभागी होऊन वृक्षारोपण केले तसेच या उपक्रमाची प्रशंसा केली. अनन्या फाउंडेशन व अश्वमेध पब्लिक स्कूल दरवर्षी असे उपक्रम राबवतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वितेसाठी शाळेच्या स्टार किड्सच्या हेड स्वाती पगार व अश्वमेधचे दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनात शिक्षक, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

बातम्या आणखी आहेत...