आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनी नदीवर बांधण्यात येणाऱ्या रंगारी खिडकी ते गांधीपुरा या भागांना जोडणाऱ्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुरु झालेल्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या पुलामुळे शहर आणि गांधीपुरा भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालिकेने ही पुलासाठी ४० लाख रुपये मंजूर केले आहेत. अंजनी नदीवर यापूर्वी लहान फारशी पुल असल्यामुळे गांधीपुरा आणि गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
लहान पुलावरून दुचाकी नेताना अडचण येत होती. पावसाळ्यात फरशीवर शेवाळ झाल्यामुळे नागरिक पाय घसरून पडत होते. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागत असे. यामुळे नवीन पुल बांधवा, अशी अनेक वर्षांपासून नागरिक मागणी केली होती. नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेवून आमदार पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. पुलासाठी साडेतीन कोटींचा खर्च येणार होता. शासनाने ३ कोटी मंजूर केले तर पालिकेने ही ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुलाचे बांधकाम वेगाने सुरु आहे. दिवाळीपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लवकरच पुलाचे लोकार्पण
या पुलाची शासनाकडून फार कमी वेळेत परवानगी आणून कामाचा मुहूर्त केला होता. त्यानंतर कामास जलद गतीने सुरुवात करून तत्काळ हे काम पूर्ण करून शहरवासीयांसाठी पुलाचे लोकार्पण करण्यात येईल, असे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.