आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात आज रॅपिड अॅक्शन फोर्स व पारोळा पोलिस ठाण्याच्या वतीने पथसंचलन (रूट मार्च) काढण्यात अाले. शहरात आज रॅपिड ऍक्शन फोर्स व पारोळा पोलिस ठाण्यातर्फे पोलिस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगरपालिका चौक, बालाजी महाराज मंदिर, राम मंदिर चौक, झपाट भवानी चौक, धरणगाव चौपाटी ते किसान कॉलेज असे पथसंचलन करण्यात आले आहे. किसान कॉलेज येथे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी, प्रिन्सिपल वाय. व्ही. पाटील, इतर प्राध्यापक वर्ग व कॉलेजचे विद्यार्थ्यांना आधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली.
या वेळी आरएएफचे डेप्युटी कमानडंट शशिकांत राय, निरीक्षक संतोषकुमार यादव, निरीक्षक राज कुमार, निरीक्षक बलकार सिंग, निरीक्षक अजयकुमार सिंग तसेच ६० आरएएफचे पुरुष कमांडो कर्मचारी, अारएएफच्या ५ महिला कमांडो तसेच पारोळा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाले, पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा पथ संचलनात समावेश होता. एरंडोल शहरात ही पथसंचलन करण्यात आले. समाजात शांतता रहावी, प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, तसेच कायद्याचा भंग करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पथ संचलनादरम्यान दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.