आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळपास १८९ वर्षांची परंपरा लाभलेला येथील श्रीमंत बालाजी महाराजांचा रथोत्सव ७ नोव्हेंबरला जय गोविंदाच्या गजरात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात भक्तीचा मळा फुलला होता.रथातील श्रीमंत बालाजी महाराजांच्या मूर्तीचे अल्पेश महेंद्र पाटील व प्रणाली अल्पेश पाटील यांच्या हस्ते दुपारी २ वाजता विधिवत पूजन करण्यात आले. धार्मिक विधी व दैनंदिन पूजा व मंत्रोच्चार प्रमोद जोशी, अनिल जोशी, नितीन जोशी, गणेश जोशी, वैभव जोशी यांनी केले. दुपारी ३ वाजता महाआरती होऊन जय गोविंदाच्या गजरात रथोत्सवाला टाळ- मृदंग व ढोल- ताशांच्या गजरात सुरुवात झाली. रथ मार्गात ठिकठिकाणी पुरुष व महिलांनी औक्षण केले. प्रसाद म्हणून केळी, बत्ताशे वाटण्यात आले.
सडा, रांगोळ्यांनी रथाचा मार्ग सजवला होता. ठिकठिकाणी व्यंकटेश धून सुरू होती. रथाला झेंडू, शेवंतीच्या फुलांनी सजवले होता. रथमार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जागोजागी व्यापाऱ्यांनी मिठाई, रेवडी, खेळण्यांचे दुकाने थाटली होती. रात्री १० वाजता रथ मूळ जागेवर आल्यानंतर महाआरती करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चोपदाराचे काम प्रा. गिरीश पाटील यांनी तर मोगरीचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे यांच्या परिवाराने केले. मशालीचे काम परशुराम अहिरे व नितीन शिरसाठ यांनी केले.
या मान्यवरांनी घेतले दर्शन
रथोत्सवात आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, नगरसेवक भूषण वाघ, वासुदेव महाजन, विघ्नहर्ता हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. भूषण मगर यांनी रथाचे दर्शन घेतले.
या मंडळांचे सहकार्य
रथाेत्सवासाठी शहरातील तरुण मंडळांसह रथ गल्ली मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, जयहिंद लेझीम मित्र मंडळ, रंगार गल्ली मित्र मंडळ, कृष्णापुरी मित्र मंडळ, पांचाळेश्वर मित्र मंडळ, नवक्रांती मित्र मंडळ, गांधी चौक मित्र मंडळ, श्रीराम चौक मित्र मंडळ, सोनार गल्ली मित्र मंडळ, शिवाजी नगर मित्र मंडळ, आठवडे बाजार मित्र मंडळ , देशमुखवाडी मित्र मंडळ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, पालिकेचे कर्मचारी, वीज महामंडळाचे कर्मचारी, दूरध्वनी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. पोलिस उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, ५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ३५ काॅन्स्टेबल व ६ महिला कॉन्स्टेबलच्या चोख पोलिस बंदोबस्त ठेवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.