आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:रावेर पंचायत समिती सेस फंड वापराच्या चौकशीची मागणी ; मर्जीतील व्यक्ती व नातेवाइकांना विविध योजनांचा लाभ दिल्याची तक्रार

रावेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या गणात विशिष्ट विकास कामे करण्यासाठी सेस फंड दिला जातो. गत पाच वर्षांत या निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केली आहे. सदस्यांनी त्यांच्या मर्जीतील व्यक्ती व नातेवाइकांना विविध योजनांचा लाभ दिल्याची ही तक्रार आहे.

सव्वा कोटी रुपये निधी खर्च : रावेर पंचायत समिती अंतर्गत गेल्या पाच वर्षांत सेस फंडाचा सुमारे सुमारे सव्वा कोटी रुपये निधी सदस्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून खर्च केला आहे. मात्र, या योजना राबवताना पात्र लाभार्थींना डावलून सदस्यांनी स्वतःच्या मर्जीतील, नातेवाइकांना लाभ दिला.

एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर पाच वर्षांत विविध योजनांचा लाभ दिल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. नियमानुसार एका योजनेचा लाभ एकदाच : नियमानुसार एका कुटुंबातील व्यक्तीला एका योजनेचा लाभ दिल्यावर पुन्हा त्याच कुटुंबाला दुसऱ्या योजनेचा लाभ देता येत नाही. मात्र, रावेरात या नियमाला तिलांजली देण्यात आली.

विशेष म्हणजे अनेक लाभार्थींचे लाभ मागणी करणारे प्रस्ताव पंचायत समितीकडे उपलब्ध नाहीत. जर प्रस्तावच नसतील तर लाभ कोणत्या आधारावर दिला? या सर्व प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी निळे निशाण संघटनेतर्फे आनंद बाविस्कर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...