आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अतिवृष्टीत वाहून गेलेला पूल पुन्हा उभारा; मुंदखेडेच्या ग्रामस्थांचे आमदारांकडे साकडे

चाळीसगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुंदखेडे खुर्द येथील वाडी नदीवरील पुल अतिवृष्टी वाहून गेला आहे. या पुलाअभावी नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या पुलाचे तत्काळ बांधकाम करावे, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील पातोंडे व मुंदखेडे या दोन गावांना जोडणारा वाडी नदीवरील पुल आहे. गेल्या वर्षी ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक झालेल्या अतिवृष्टीने अर्धा पुलासह दोनशे मीटरचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे ये-जा करण्याचा मार्ग काहीअंशी बंद होऊन प्रवास कसा करावा? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. त्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, पुलाची आजपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे वाडी नदीवरील पुलाच्या बांधकामाला तातडीने सुरूवात करावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दोन्ही गावांतील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर संजय पाटील, रमेश कुमावत, भागवत पाटील, महेश पाटील, शांताराम पाटील, मंगेश वाबळे, प्रल्हाद पाटील, राहुल पाटील, बंटी पाटील, मंगेश पाटील व दीपक गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...