आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारी वाड्यातील रहिवाशांची मागणी:मोकाट गुरांच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

यावल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोकाट गुरांच्या धडकेत यावलमधील प्रौढाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुरांच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्या वारसांना भरपाई द्यावी, अशी मागणी बारीवाडा भागातील नागरिकांनी पालिकेकडे निवेदनातून केली. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

बारीवाडा भागातील रहिवासी नथू यशवंत पाटील-बारी यांना मोकाट गुराने धक्का दिला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोकाट गुरांच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, बारी यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी अशी मागणी केली. पालिकेत स्थापत्य अभियंता योगेश मदने यांना निवेदन देण्यात आले. तुकाराम बारी, नितीन बारी, नीलेश बारी, प्रमोद बारी, राजेंद्र पाटील, किरण बारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...