आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी, तहसीलला मिळेल अर्ज

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार, पदवीधर मतदार यादीचा नावनोंदणी कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पदवीधरांची मतदार नोंदणी केली जात आहे.

या अंतर्गत पाचोरा तालुक्यातील पात्र पदवीधरांनी आपल्या भागातील संबंधीत मंडळाधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेतून पदवीधर मतदार नोंदणीचा फॉर्म नमुना नं १८ घ्यावा. सोबत पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रीका तसेच मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक आदी कागदपत्रे जोडावी.

कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संबंधित कायदेशीर पुरावा स्वयंसाक्षांकित तसेच पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून अधिप्रमाणित करून जोडणे आवश्यक आहे. पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म नमुना नं. १८ हा आपल्या रहिवासी भागातील मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावा. पाचोरा तालुक्यातील सर्व पदवीधर नागरीक , शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पात्र नागरिकांनी नोंदणी करुन घ्यावी.

पात्र मतदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आगामी काळातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने मतदार यादीत नावनोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे. पात्र पदवीधर मतदारांनी, या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...