आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:शिष्यवृत्ती जमा करण्यास नकार दिल्याने संताप

पहूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एका बँकेच्या नवीनच रुजू झालेल्या शाखा व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती करून ही काम करत नसल्याने अखेर संस्थाचालकांनी बँक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहूर ग्रुप एज्युकेशन संस्था संचालित आर. टी. लेले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे पहूर येथील विविध बँकांमध्ये बचत खाते आहेत. लेले हायस्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यात नियमित वर्ग केली जाते. ही रक्कम नियमितपणे आयडीबीआय बँकेच्या पहूर शाखेतूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जात होती. परंतु मागील महिन्यात नवीन शाखा व्यवस्थापक रोहित सिंग हे रुजू झालेत.

त्यांनी ही रक्कम स्टेट बँकेच्या खात्यातूनच वर्ग करावी, अशी माहिती देत आमची शाखा सदर रक्कम वर्ग करणार नाही असे सांगितले. दरम्यान, शाळेचे लिपिक भारत पाटील व मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी ही बाब संस्थेचे व्हॉइस चेअरमन साहेबराव देशमुख, संचालक अॅड. संजय पाटील, बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, सलीम शेख, अबू तडवी यांना सांगितली.

अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे
या वेळी रामेश्वर पाटील, सलीम शेख व संजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना समज देत ग्राहकांशी चांगलं वागण्याचा सल्ला दिला. या वेळी उपस्थित ग्राहकांनी ही बँक कर्मचारी व अधिकारी ग्राहकांशी व्यवस्थित बोलत नसल्याची तक्रार केली. तसेच कित्येक दिवसांपासून पासबुक मिळत नसल्याचे सांगितले. ई-केवायसीच्या नावाखाली दररोज ये-जा करावी लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्राहकांनी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...