आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामे ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ६ व ७ जून रोजी ग्रामपंचायतींमध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होणार आहे. यात कजगाव, कोळगाव, निंभोरा, आडळसे, पथराड, अंतुर्ली या ६ ग्रामपंचायतींच्या प्रभागांमधील सदस्य पदांचे आरक्षण काढले जाईल.
कजगाव १७ जागा, कोळगाव ११ जागा, निंभोरा ९ जागा, आडळसे ७ जागा, पथराड ७ जागा व अंतुर्ली ९ जागा अशा या ग्रामपंचायतींच्या प्रभागातील सदस्य पदासाठी जागांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याबाबत या गावांमध्ये आरक्षण सोडतीबाबत दवंडीही देण्यात आलेली आहे. आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.
यात कजगाव ग्रामपंचायतीसाठी मंडळाधिकारी राजेंद्र शेजवळ, कोळगाव ग्रामपंचायतीसाठी मंडळाधिकारी नीलेश बागड, आडळसे ग्रामपंचायतीत अव्वल कारकून विजय येवले, पथराड ग्रामपंचायतीसाठी अव्वल कारकून एस.डी.सोनवणे, अंतुर्लीत मंडळाधिकारी दिलीप राजपूत, निंभोरा येथे मंडळाधिकारी डी.एस.चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. अशी माहिती भडगाव तहसील कार्यालयाचे लिपिक दिलीप राजपूत यांनी दिली. या आरक्षण सोडतीची नागरीकांना उत्सुकता लागली आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघते, याची उत्कंठा वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.