आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१२ रोजी बोरी वसाहत येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोरी मध्यम प्रकल्पासाठी रब्बी हंगामाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत बाेरीतून ३ तर भाेकरबारीतून २ आवर्तन देण्याचा ठराव करण्यात आला.
बैठकीला उपविभगीय अभियंता एस. ओ. पवार, शाखा अधिकारी पी. जे. काकडे, शाखा अधिकारी अजिंक्य पाटील तसेच कालवा सल्लागार समिती सदस्य हजर होते. या वेळी मनोहर रामराव पाटील, राजाराम पाटील, पी. व्ही. पाटील, भैयासाहेब रामदास पाटील तसेच कालवा निरीक्षक नाना पाटील, शशिकांत ठाकरे, अतुल पाटील, कमलेश दाभाडे विकास देवरे, विनोद पाटील, धनराज माळी, पी. एस. पाटील, नंदू पाटील व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
यावर्षी रब्बी हंगामाकरिता बोरी प्रकल्पातून कालव्याद्वारे सिंचनाकरिता ३ आवर्तन देण्यात यावे, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन देण्यात यावे, अशी सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी केली हाेती.
या प्रमाणे बोरी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगाम २०२२-२३ व उन्हाळी बिगर सिंचन कालव्याद्वारे पाणी देण्याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. पी. चव्हाण यांच्या उपस्थितीत निर्णय होऊन त्यास मान्यता देण्यात आली. तसेच सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ पाणी अर्ज भरुन सिंचन पाणीपट्टी भरण्याचे सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल यांनी केले. तर भोकरबारी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे सिंचनाचे २ आवर्तन देण्याचे ठरवले. सूत्रसंचालन व्ही. एम. पाटील यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.