आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत:कजगाव शाळेतील बाल‎ आनंद मेळाव्यास प्रतिसाद‎

कजगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील‎ जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत ४‎ फेब्रुवारीला बाल आनंद मेळाव्याचे‎ तसेच निपुण भारत कार्यक्रम‌‌‌ अंतर्गत‎ पालक व माता पालक मेळाव्याचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ आनंद मेळाव्याचे उद्घाटन‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा उपसरपंच‎ स्विटी धाडीवाल यांच्या हस्ते झाले.

या‎ कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य‎ शोभाताई बोरसे, वैशाली हिरे, सादिक‎ मन्यार, सदस्य विजय गायकवाड,‎ मांगीलाल मोरे, अनिल महाजन, दिनेश‎ धाडीवाल, दिनेश पाटील, धर्मराज हिरे,‎ विनोद हिरे, तुकाराम महाजन, भगवान‎ महाजन, समाधान बोरसे, केंद्र प्रमुख‎ कोमलसिंग पाटील, मुख्याध्यापिका‎ रंजना भांडारकर व दोन्ही शाळेतील‎ शिक्षक उपस्थित होते. या वेळी निपुण‎ भारत अंतर्गत पालक व माता पालक‎ गटांच्या मेळाव्याचे तसेच माता पालक‎ मेळाव्याचे आयोजन केले हाेते.‎ प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील‎ महाजन यांनी केले. बाल आनंद‎ मेळाव्यात विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या‎ खाद्य पदार्थांचे स्टॉल लावलेले होते.‎ सर्व उपस्थितांसह मुली, पालक, माता‎ पालकांनी विविध खाद्य पदार्थ खरेदी‎ करुन करून विद्यार्थिनींचा उत्साह‎ वाढवला.‎

बातम्या आणखी आहेत...