आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा आयोजित:शिव संकल्प प्रतिष्ठानच्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

रोटवद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त रोटवद येथे शिवसंकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विविध दात्यांचे सहकार्याने या वेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. यात गणेशोत्सवानिमित्त ९ सप्टेंबर रोजी नंदुरबार येथील पोलिस कर्मचारी अमोल कडूबा देशमुख यांच्या मार्गदर्शनात व आर्थिक सहकार्याने शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सौजन्याने ३ किलाेमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

माजी पोलिस पाटील स्वर्गीय लक्ष्मण भिका पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत १६ वर्षावरील मुलांच्या गटात जवळपास ६० स्पर्धकांनी तर १६ वर्षाखालील गटात सुमारे ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. दोन्ही गटात पहिले ५ क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना रोख बक्षीस देवून गाैरवण्यात आले. स्पर्धेस शिवसंकल्प प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...