आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद:पिंपळे येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळे येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला, रांगोळी, धावणे अशा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सभापती विमल पाटील यांनी केले. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते. रांगोळी स्पर्धेत चिमणपुरी पिंपळेची विद्यार्थिनी वैष्णवी लोटन पाटील (सातवी) हिने प्रथम क्रमांक मिळवला. डिंपल महेश पाटील हिने द्वितीय तर निबंध स्पर्धेत कुणाल चेतन पाटीलने प्रथम, रोशनी आनंदा पाटील हिने दुसरा क्रमांक मिळवला.

चित्रकला स्पर्धेत प्रितेश भैय्यासाहेब पाटील (दुसरी) याने प्रथम, तिसरीतील सुप्रिया सचिन पाटीलने दुसरा तर धावण्याच्या स्पर्धेत चौथीतील कृतिका गोकुळ कोळी, सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाने (पिंपळे)े प्रथम क्रमांक मिळवला. तर इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांमध्ये राजेश कैलास पाटीलने प्रथम, तुषार अधिकार पाटील द्वितीय, तर रितेश कमलसिंग पाटीलने तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थिनींमध्ये तेजल महेंद्र पाटील प्रथम, धनश्री कृष्णा निकम द्वितीय, भाग्यश्री अरुण सांधेनाथने तृतीय क्रमांक मिळवला. आठवी ते दहावीच्या गटात विद्यार्थ्यांमध्ये भावेश धर्मेंद्र मस्के (इयत्ता नववी) प्रथम, तेजस प्रमोद पाटील द्वितीय, तर रुपेश रामकृष्ण पाटील (इयत्ता दहावी) या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थिनींच्या गटात इयत्ता आठवीची विद्यार्थिनी खुशी संदेश जैन प्रथम, साक्षी मदनसिंग पाटील द्वितीय, तर उर्मिला विनोद पाटीलने तृतीय क्रमांक मिळवला.

बातम्या आणखी आहेत...