आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचा अंतरिम (तात्पुरता) निकाल नुकताच जाहीर झाला. गुणपडताळणीसाठी १७ नाेव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निकाल
www.mscepune.in व https://www.mscepupp ss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला अाहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गुण पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० याप्रमाणे शुल्काची रक्कम आकारली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादींमध्ये दुरुस्तीसाठी १७ पर्यंत मुदत राहील. गुणपडताळणीचा निकाल अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कळवला जाईल. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्तांनी पत्राद्वारे दिली अाहे. दरम्यान्, वरील परीक्षा दिलेल्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.