आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोषात स्वागत मिरवणूक:निवृत्त जवानाचे चोपडा येथे स्वागत

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मल्हारपुरा भागातील रहिवासी जवान देवेंद्र आबासाहेब वाघ हे २१ वर्षे सीआरपीएफमध्ये देशसेवा करून, ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे चोपडा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.२१ वर्षांच्या काळात त्यांनी जम्मू काश्मीर, बिहार, झारखंड, गुजरात, ईशान्य भारत, छत्तीसगड यासारख्या देशातील दहशतवादी तसेच नक्षलग्रस्त भागात समर्पित भावनेने सेवा दिली. मागील एक वर्षांपासून ते अतिशीघ्र कृतीदल अर्थात रॅपिड ॲक्शन फोर्स अहमदाबाद येथे सेवारत होते.

त्यांच्या सेवापुर्तीनिमित्त शहरवासीयांनी त्यांची डिजेच्या तालावर देशभक्तीपर गीते सादर करून तसेच घोड्यावर भव्य मिरवणूक काढून स्वागत केले. मिरवणूक बस स्थानक परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तपस्वी मारुती चौक, भवानी माता मंदिर मार्गे त्यांच्या निवासस्थानी गेली. शहरवासीयांनी औक्षण करून त्यांचे स्वागत व सत्कार केला. एसटी महामंडळ, आनंदी भवानी संस्थान, जय भवानी मंडळ, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना यांनी त्यांचा सत्कार केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीश पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोर चौधरी, सेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, गजेंद्र जयस्वाल, देवा पारधी, मोहन बापू, आगार व्यवस्थापक संदेश क्षिरसागर, उपप्राचार्य डॉ. किशोर सोनवणे उपस्थित होते. जवान देवेंद्र वाघ हे एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव व लेखाधिकारी योगराज पाटील यांचे लहान बंधू आहेत.

बातम्या आणखी आहेत...