आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:वेतनाचा प्रश्न सुटल्याने मुख्याधिकारी यांचा निवृत्त शिक्षकांनी केला सत्कार; नगरपालिकेकडील 10 टक्के हिश्श्याची रक्कम दिल्याने सुटला प्रश्न

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उदार मनाने १० टक्के रक्कम देऊन निवृत्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सोडवल्याने सर्व निवृत्त वेतन धारक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी सरोदे यांचा सत्कार करण्यात आला.

येथील नगर परिषद शिक्षण मंडळास नियमाप्रमाणे १० टक्के हिश्याची रक्कम पालिकेडून मिळण्यास विलंब झाला होता. ही रक्कम पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उपलब्ध करुन दिले होते. यामुळे निवृत्त वेतन धारकांचा वेतनाचा प्रश्न सुटला आहे. याबद्दल मुख्याधिकारी सरोदे यांचा निवृत्त कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. या वेळी त्यांच्यासोबत नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

तर आमदार अनिल पाटील यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. या वेळी हाजी कादर जनाब, सत्तार मास्तर, साहेबराव त्र्यंबक गुरुजी, हमीद अन्सारी, हमीद अमीर खाटीक, सावे गुरुजी यांच्या हस्ते मान्यवरांना बुके, शाल व अभिनंदन पत्र देण्यात आले. या प्रसंगी लेखपाल सुनील पाटील यांचाही गाैरव करण्यात आला. सूत्रसंचालन जावेद अख्तर, तर रवींद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...