आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालव्यासाठी आवर्तन:गिरणाचे पांझण डावा कालव्यासाठी आवर्तन

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकसह जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणारे गिरणा धरण यंदा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. त्यामुळे यंदाही रब्बीसाठी सिंचनाचे तीन आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान, गिरणा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी १५ रोजी सिंचनाचे पांझण डावा कालव्याचे पहिले आवर्तन साेडण्यात आले.

गिरणा धरणातून डाव्या पांझण कालव्यासाठी गुरुवारी ४० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. त्याचा लाभ नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील जवळपास १४ हजार हेक्टर शेतीला होणार आहे. दरम्यान, गिरणा धरण यंदाही ओव्हर-फ्लो झाल्याने गिरणा पट्ट्यात रब्बी हंगाम बहरणार आहे.

गिरणाच्या पाण्यावर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती ओलिताखाली येते. तर पांझण डावा कालव्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील ४ हजार हेक्टर तर धुळे जिल्ह्यातील ३ हजार हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव या तालुक्यातील ७ हजार हेक्टर क्षेत्राला मिळतो. त्यामुळे यंदा गिरणा परिसरात रब्बीचा हंगाम चांगलाच बहरणार आहे. दरम्यान, गत वर्षी चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यंदाच्या पाऊस कमी असला तरी गिरणा धरण सलग चौथ्यांदा ओव्हर-फ्लो झाले हाेते.

नदीतूनही सुटेल आवर्तन
जामदा डावा व उजवा कालव्यावर जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती रब्बीच्या सिंचनाखाली येते. गुरुवारी पंाझण डावा कालव्यासाठी गिरणेतून ४० क्युसेक पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर सिंचनासाठी गिरणा नदीतून शुक्रवारी किंवा शनिवारी गिरणातून आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...