आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रिक्षा, पिकअपची धडक; दोन ठार, चार जण जखमी

आमोदा/सावदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ येथून फैजपूरकडे प्रवासी घेऊन येणारी रिक्षा आणि समोरून येणारी मालवाहू पिकअप यांची, आमोदा गावाजवळ धडक झाली. १६ रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान झालेल्या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी ठार तर चाैघे जखमी झाले.

आमोदे गावाच्या पुढील वळणावर रिक्षा (एम.एच.सी. डब्ल्यू ३२२४) आणि पिकअप (एम.एच.४८ टी.६४१४) यांची धडक झाली. यात रिक्षाचालक सैय्यद नूर सैय्यद रऊफ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील सुरेश पिला पाटील (वय ७४, रा.चिनावल) या जखमी वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटल येथे नेत असताना मृत्यू झाला. तर रिक्षामधील सावदा येथील बुधवारा साळीवाळा परिसरातील ज्ञानेश्वर दत्तात्रेय साळी (वय ४८), संगीता ज्ञानेश्वर साळी (वय ४०), आरती ज्ञानेश्वर साळी, कांचन ज्ञानेश्वर साळी हे एकाच कुटूंबातील चौघे जखमी झाले, उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...