आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक:रिक्षा; दुचाकी अपघातात दाेघे दुचाकीस्वार जखमी

अडावद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालवाहू रिक्षा आणि दुचाकीच्या येथून जवळच असलेल्या हतनूर कालव्यावरील पुलाजवळ झालेल्या अपघातात दुचाकी स्वार दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.अडावदपासून तीन किलोमीटर अंतरावरील हतनूर कालव्यावरील पुलावर चोपड्याकडून येणाऱ्या मालवाहू रिक्षा (एमएच- १९, सीडब्ल्यू- ३७२१) व अडावदकडून येणाऱ्या दुचाकी (एमपी- ११, एनबी- ४४७०) या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.

यात दुचाकीस्वार दोन्ही तरूण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत अडावद पोलिस ठाण्यात अपघाताबाबत कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नाेंद करण्यात आलेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...