आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार किशोर पाटील यांनी उपोषणाचा इशारा देताच कजगाव येथील केटी वेअरच्या कामाचा शुभारंभ झाला होता. कार्यकारी अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. कामाला सुरुवात झाली असली, तरी कामाच्या गुणवत्तेबाबस शंका व्यक्त केली जात आहे.
केटी वेअरच्या बाजूने शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी आहे. गेल्या ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात केटी वेअरचा भराव वाहून गेला होता. या कामाची पाहणी करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.टी. ठाकरे, उपविभागीय अधिकारी जे.ए. महाजन, शाखा अभियंता वनखंडे यांनी भेट दिली होती. केटी वेअरलगत शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता होणे गरजेचे असल्याची बाब, शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या लक्षात आणून दिली. ४७ लाख रुपये मंजुर दप्तर दिरंगाई करत हे काम पावसाळ्याच्या तोंडावर मंजूर झाले. कामासाठी ४७ लाखांचा निधी मंजूर आहे. पावसाळ्याचा अडथळा आल्यास हे काम पुन्हा थांबेल. पिचिंगचा प्रश्न अनुत्तरीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, कामाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. पण सर्वात मोठा प्रश्न हा पिचिंगचा असून, अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात उत्तर मिळाले नाही.
पुरामुळे होते नुकसान
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू झाले. मात्र, काम गुणवत्तापूर्ण असेल की नाही याबद्दल साशंकता आहे. यात वापरला जाणारा दगड हा निकृष्ट दर्जाचा आहे. मागील वर्षी पुरामुळे नदीकाठावरील विहिरीत गाळ साठून नुकसान झाले होते. यंदाही अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यासाठी नदीचा प्रवाह समोरील बाजूस असल्याने तो सरळ वरच्या दिशेने येतो तरी दोन्ही बाजूस खोलीकरण केल्यास प्रवाह समान होईल. रामसिंग पाटील, शेतकरी, कजगाव
केटी वेअरच्या कामाला सध्या गती मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.