आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवासी दोन दिवसांपासून अंधारात:रोहित्र जळाले; दोन दिवसांपासून वाकोद येथील ग्रामस्थ अंधारात

वाकोदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बाजारपेठ, मेडिकल गल्ली, तोंडापूर रस्ता परिसरातील राेहित्र जळाल्याने या परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून अंधारात आहेत.रोहित्रावर अतिरिक्त भार पडल्याने बाजारपेठ, मेडिकल गल्ली, ताेंडापूर रस्ता या परिसराला वीज पुरवठा करणारे रोहित्र जळाले आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी हा परिसर आकोडेमुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात संतप्त नागरिकांनी पहूर येथील महावितरणचे कार्यालय गाठून सहाय्यक अभियंता सुरेश चौधरी यांना निवेदन दिले. तरी हा परिसर आकोडेमुक्त न होता आकड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रोहित्र जळाले आहे. या भागात मीटर घेणाऱ्यांपेक्षा अवैध वीज वापरणारे जास्त लाेक आहेत. आकोडेधारक संबंधित फेजवर वीज नसल्यास दुसरीकडे लगेच आकडे टाकून वीजपुरवठा सुरळीत करून घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...