आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथून जवळच असलेले सांगवी गाव रोहित्र जळाल्यामुळे आठ दिवसांपासून नादुरुस्त झाल्याने गाव अंधारात होते. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे समस्या मांडूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सांगवी ग्रामस्थांनी मंगळवारी थेट पहूर येथील कार्यालयावर मोर्चा आणला. त्यामुळे सायंकाळी सांगवी गावाला रोहित्र मिळाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत गावाचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. आठ दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त झाल्याने नागरिकांनी सहाय्यक अभियंता कार्यालय पहूर (२) गाठले. त्यामुळे ग्रामस्थांनी पहूर उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. तेेथेही अधिकारी नसल्याने समस्या मांडावी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला. या पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी, जामनेरचे उपकार्यकारी अभियंता विजय करेरा यांच्याकडे नवीन रोहित्राची मागणी केली. परंतु आठ दिवस होऊनही गाव अंधारात असल्याने रामेश्वर पाटील, राजधर पांढरे, अब्बू तडवी व भारत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी थेट पहुर उपकार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा आणला. त्यावेळीही कार्यालयात अधिकारी नव्हते. रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने सांगवी गावासाठी रोहित्र पाठवले.
साहित्य उपलब्ध नव्हते, वीज बिले लवकर भरावीत ^सध्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याने रोहित्र दुरूस्तीसाठी विलंब होतो. नागरिकांनी वेळोवेळी वीजबिले भरल्यास महावितरण कंपनीला हे साहित्य लवकर उपलब्ध करता येईल. परंतु नागरिक बिलच भरत नसल्याने थकबाकी वाढली अाहे. विजय करेरा, कार्यकारी अभियंता, जामनेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.