आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हमी:जामनेरात जेसीबी, पोकलँड मशीनने होतात रोहयोची कामे ; विलास राजपूत यांचा आरोप

जामनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगार हमी योजनेची कामे तालुक्यात रात्रीतून जेसीबी व पोकलॅँड मशीनद्वारे झाली. तसेच या कामांच्या वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे विलास राजपूत यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळी पंचायत समितीत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत राजपूत यांनी हा आरोप केला. ३२ पेक्षा जास्त गावांमधील कामे यंत्रांद्वारे झाली. याबाबत तक्रारी वाढल्याने काही नागरीकांनी चित्रिकरण केले. त्यावरून बुधवारी सरपंच परिषदव पं.स. पदाधिकारी पंचायत समितीत जमले. यावेळी केवळ भाजपच्याच पदाधिकाऱ्यांच्या कामांना मंजूरी दिल्याचे आरोप विलास राजपूत यांनी केले. कामे यंत्राने झाल्याबाबत तक्रारी वाढताच, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक सुटीवर गेले. चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर बिले सादर न करण्याबाबत सूचना दिल्या जातील. काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करू, असे बीडीओ सनेर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...