आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज जगात पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात जागतिक स्तरावर सुरू असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपली जबाबदारी ओळखून चोपडा येथील रोटरी क्लबने ई-बाइक रॅलीचे आयोजन करून समाजात जनजागृती केली. चोपडा रोटरी क्लबतर्फे आयोजित रोटरी उत्सवाच्या प्रचारासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक रॅलीचे आयोजन करण्यात केले. या रॅलीसाठी जळगाव येथील सीका कंपनीच्या पुढाकाराने इलेक्ट्रॉनिक बाइक उपलब्ध करून देण्यात आल्या हाेत्या. धरणगाव रस्त्यावरील आनंद सुपर शॉपी येथून सुरु झालेली ई-बाईक रॅली धनवाडी फाटा, पंकज नगर, बस स्थानक, ग्रामीण पोलिस ठाणे, थाळनेर दरवाजा, चिंच चौक, गोल मंदिर, चावडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे पुन्हा आनंद सुपर शॉपी येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला.
कस्तुरबा विद्यालयातील एन. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींचे लेझीम पथक रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत रोटरीचे अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख चेतन टाटिया, उप प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे, तेजस जैन, पृथ्वीराज राजपूत, अर्पित अग्रवाल, खजिनदार पवन गुजराथी, उप प्रांतपाल नितीन अहिरराव, सीका बाइकचे संचालक राजू पाटील, कस्तुरबा शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक एन. आर. पाटील तसेच रोटरी व सीका बाइकचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.