आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाला चालना:पारोळा शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकांच्या सुशोभिकरणासाठी पुन्हा 5 कोटी रुपये मंजूर, आमदारांच्या प्रयत्नांना यश; गटारींसह रस्त्यांची होणार कामे​​​​​​​

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य चौक व कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. या चौकांची व नवीन रस्त्यांची शहरवासीयांतर्फे आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे मागणी केली जात होती. याची दखल घेत आमदार चिमणराव पाटील यांनी या कामासाठी शासनाकडून नव्याने पुन्हा पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.

शहरात यापूर्वी ही रस्ते विकासासाठी ४ कोटी, जलतरण तलाव बांधकामासाठी २.५० कोटी, शहरासाठी ज्वलंत असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटी तर आता शहरातील आझाद चौक सुशोभिकरणासाठी ५० लाख, झपाट भवानी चौक सुशोभिकरणासाठी ५० लाख, मोठा महादेव चौक सुशोभिकरणासाठी २५ लाख, शनी मंदिर भागातील तुकाराम महाराज चौक सुशोभिकरणासाठी २५ लाख, गट नंबर १३८ या ओपन स्पेसमध्ये बगीचा विकसित करण्यासाठी ५० लाख, गट नंबर ७६८ या ओपन स्पेसमध्ये बगीचा, व्यायामशाळा व वाचनालय विकसित करण्यासाठी ५० लाख, शहरातील पीर दरवाजा ते नगर परिषद ते पाताळेश्वर मंदिर प्रवेशद्वारापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी ८२ लाख, कजगाव रस्ता ते विश्वास चौधरी यांच्या घरावरून आर. सी. पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३७ लाख, बँक ऑफ महाराष्ट्र ते मोठा महादेव चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १६ लाख, जगमोहनदास नगरातील एल. बी. नेतकर यांच्या घरापासून ते एच. बी. पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासह गटारीच्या बांधकामासाठी १८ लाख, जगमोहनदास नगरातील लोटन शिंपी यांच्या घरापासून ते मिलिंद मिसर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व गटारी बांधण्यासाठी १४ लाख, जगमोहनदास नगरातील दाडकर यांच्या घरापासून ते एल. पी. मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी १६ लाख, उंदिरखेडा रस्त्यापासून ते सी. के. वाणी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २७ लाख, पंडित कुंभार यांच्या घरापासून ते हॉटेल साहेबा, एस. डी. मोरे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरणासाठी २२ लाख असे एकूण ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे शहराचा विकासात भर पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...