आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा उत्साहात:अंजिठा डोंगरात रुद्रेश्वर महादेवाची यात्रा उत्साहात

शेंदुर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा डोंगररांगेच्या कुशीतील रुद्रेश्वर लेणी पर्यटकांचे आकर्षण आहे. श्रावण महिन्यात लेणीतील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे यात्रा भरली. धबधबा, हिरवेगार डोंगर आणि लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी महादेवांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

जगप्रसिद्ध अजिंठा डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी आहे. स्थापत्य कला आणि निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. येथील धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होत. लेणीत ६० फूट लांब आणि १२ फूट उंच सभामंडप आहे. लेणीच्या मध्यभागी आकर्षक गणेशमूर्ती आहे. डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लांबून भाविक येतात. मूर्तीशेजारी उजव्या बाजूस नरसिंह व डाव्या बाजूस नटराजाचे शिल्प आहे. लेणीत चौथऱ्यावर महादेवाची पिंड असून, समोर नंदीची देखणी मूर्ती आहे. लेणीत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कोरीव काम पाहता येत नाही. पूर्वीच्या कोरीव कामाचे अवशेष भिंतीलगत दिसतात, मात्र नक्षीची झीज झाली आहे. लेणीवरून तीर्थकुंडात पडणारा धबधबा आकर्षण आहे. सोयगावचे धरण, वेताळवाडी किल्ला दिसतो.

बातम्या आणखी आहेत...