आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:चाळीसगाव येथील 70 कामगारांना सुरक्षा पेटी; शिबिरात 100 कामगारांची संपूर्ण आरोग्य तपासणी

चाळीसगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार दिनाच्या औचित्य साधून आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ७० बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी वाटप करण्यात आली. तर १०० कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, नगरसेवक बबन पवार, चैतन्य तांडा उपसरपंच आनंद राठोड, दादाभाऊ देवरे, महालॅब कॉर्डिनेटर संतोष सोनवणे, जळगाव लॅब कॉर्डिनेटर चेतन धनगर, आकाश पारधी, विजय महाजन, विकास देशमुख, मीना राठोड, कोमल जगताप, डॉक्टर कल्पेश बहाळकर आदी उपस्थित होते.

यासोबत १०० कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शासनाच्या महालॅब मार्फत कान, डोळे तपासणी, तापमान मोजणी, रक्तदाब मोजणी, हृदयाची तपासणी, शुगर तपासणी, लिव्हर सबंधित तपासणी, किडनी, थायरॉईड तपासणी व निदान मोफत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...