आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:चाळीसगावच्या सह्याद्री प्रतिष्ठान उपक्रम; कचरा गाेळा करून केला नष्ट

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील राजदेहरे येथील पुरातन ऐतिहासिक किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जवळपास ३० दुर्गसेवक, दुर्ग सेविकांनी सहभाग घेऊन किल्ल्यावरील दगड, मातीच्या भरावाने बुजले गेलेले पुरातन पाण्याचे टाक्या सर्व दगड आणि माती काढून पुन्हा मोकळे केल्या. तसेच किल्ल्यावर असलेला प्लास्टिक कचरा गाेळा करून नष्ट करण्यात आला. या किल्ल्यावर पुरातत्त्व विभाग व वन विभागाच्या परवानगीने पुढील जे कामे करता येतील, त्यासाठी संपूर्ण किल्ल्याची पाहणी करून नोंदी घेण्यात आल्या.

लवकरच या किल्ल्यावर स्थानिक राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशन व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तसेच पुरातत्त्व व वन विभागाच्या परवानगीने माेठी दुर्ग संवर्धन मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, संपर्क प्रमुख प्रकाश नायर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभम चव्हाण, प्रशासक गजानन मोरे, विनोद शिंपी, रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र दुसिंग, अरुण अजबे, अनिल कुडे, संदीप वराडे, यश राजपूत, कपिल कुमावत, चेतना भागवत, मुकूल भागवत, कोमल भागवत, अथर्व शिरुडे, हर्षल पाटील, प्रणव बागडे, अथर्व देव, तसेच राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशनचे अंकुश राठोड, पवन राठोड, अमोल राठोड, निमिचंद राठोड, वासुदेव राठोड, श्याम मोरे, योगेश जाधव, अमोल चव्हाण आदींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...