आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:समीक्षा, नंदिनी, अक्षदाच्या उपकरणाला पहिले बक्षीस; शिंदाड येथे आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा पंचायत समितीचा शिक्षण विभाग व समाज विकास विद्यालय, शिंदाड, ता. पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २ सप्टेंबर रोजी ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. समाज विकास विद्यालयाने आयोजित केेलेल्या या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या ४५ तर माध्यमिक विभागाचे ५५ विद्यार्थ्यांनी उपकरणे सादर केली. तर प्राथमिक शिक्षक विभाग ५ व माध्यमिक शिक्षक विभागाने ५ अशा संख्येने विज्ञान-तंत्रज्ञान, खेळ, गणिती मॉडेल, सोलर, प्रदूषण अशा विविध विषय, प्रश्नांसंदर्भात प्रदर्शन मांडण्यात आले होते.

उद्घाटना प्रसंगी आपल्या मनोगतातून आमदार किशोर पाटील यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे तसेच विद्यार्थ्यांनी मन व मनगट मजबूत करणे तसेच आजचा विद्यार्थी हा भविष्यातील वैज्ञानिक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनास माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, चिटणीस विलास वाणी, संचालक विकास पाटील, प्रताप लोधी, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, विनायक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, स्वप्निल पाटील, धनराज पाटील, मुख्याध्यापक ए.पी. गव्हाले, केंद्रप्रमुख, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांनी व सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले. तर आभार एस.यु. गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिंदाड विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विज्ञान प्रदर्शनात विजेते
या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून जे.जे. पंडित विद्यालय, लोहाराची विद्यार्थिनी समीक्षा शिवाजी क्षीरसागर तर माध्यमिक गटात समाज विकास विद्यालयाची विद्यार्थिनी नंदिनी नामदेव परदेशी, अक्षदा उत्तम पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरीचे शिक्षक ज्ञानेश्वर तुकाराम पाटील तर माध्यमिक गटात येथील ए.टी. गुजराती कन्या शाळा, नगरदेवळ्याचे शिक्षक रवींद्र हिलाल सूर्यवंशी यांच्या उपक्रमास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

बातम्या आणखी आहेत...