आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा स्तुत्य उपक्रम:सम्राट अशोक प्राथमिक शाळेत रंगभरण स्पर्धा

चाळीसगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने, विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका एस. डी.महाजन व प्रमुख अतिथी विजय महाजन होते. इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व आण्णा भाऊ साठे यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत भारताच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या तिरंगा ध्वजाचे चित्र काढून, त्यात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रंग भरून यात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच बाल वर्गाच्या विद्यार्थ्यांनीही चित्रात कोलाज काम करून चित्र पूर्ण केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. विजय महाजन यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व आण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट व संस्कारक्षम गोष्टी छान प्रकारे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बोरसे यांनी केले. आभार विकास गायकवाड यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. मान्यवरांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...