आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले:जवखेडेसीमचे सरपंच दिनेश पाटील अपात्र

एरंडोल6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जवखेडे सीम येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ नाशिकच्या अपर आयुक्तांनी ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविले आहे.सरपंच पाटील यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्याबाबत जवखेडे सीमचे ग्रामस्थ प्रवीण पाटील यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यावर चौकशी होवून बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले. पदाचा दुरुपयोग करुन शासकीय जमिनीची भोगवटा सदरी नोंद केल्याचे सिध्द झाल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सरपंच पाटील यांना अपात्र ठरविले होते. आत्याला घरासाठी ती शासकीय जागा दिलेली होती. वारस नसल्यामुळे त्यांनी ती जागा माझ्या नावावर करुन दिली असल्याचा बचाव पाटील यांनी केला होता. तो जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला होता. त्यांच्या निर्णयाविरुध्द पाटील यांनी अपर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्या अपीलावर सुनावणी झाली. अपर आयुक्तांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेबाबतचा निर्णय कायम ठेवला. सरपंच पाटील यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र ठरवले.

बातम्या आणखी आहेत...