आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोपडा तालुक्यातील मोहरद येथील सरपंचांनी मिळालेला पहिला पगार आपल्या गावातील विधवा महिलांना वाटप केला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. मोहरद येथील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी यांनी मिळालेला मासिक पगार गावातील विधवा महिलांना देऊन त्यांचा सन्मान केला. जागतिक महिला दिनाचे अाैचित्य साधून तडवी यांना पहिला व दुसऱ्या महिन्याचे अनुक्रमे ६ हजार रुपये गावातील ४५ विधवा महिलांना वाटप केले. यावेळी परिसरातील ४०० महिला उपस्थित होत्या.
या वेळी प्रत्येक महिलेला बोलण्याची संधी देण्यात आली. या प्रसंगी धानोरा येथील ग्रामपंचायत सदस्या मेघा चौधरी यांनी महिला सशक्तीकरणासह सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. सरपंच अंजुम तडवी यांनी महिलांना स्वावलंबी होऊन प्रत्येक कार्यात सहभागी घेत परिवार सुशिक्षित केला पाहिजे. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठीही प्रयत्न करावा, असे अावाहन केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्या हफशानबाई तडवी, मेहदुल तडवी, शकीला तडवी, पोलिस पाटील रजिया तडवी, मेघा चौधरी, जहानुर तडवी, अंगणवाडी सेविका हिराबाई महाले, सुनीता पाटील, इरशाद तडवी, मदतनीस, आशा वर्कर रजिया तडवी, रुक्साना तडवी, किनगाव येथील अमिर प्रतिष्ठानच्या शिक्षिकांसह अनेक महिला उपस्थित होत्या.
महिलांच्या योजनांचा विशेष अभ्यास
ग्रामीण भागातील महिलांना समस्यांची जाण असूनही त्यांची सोडवणूक होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे महिलांच्या विशेष योजनांचा अभ्यास सुरु आहे. यामुळे गावातील प्रत्येक महिलेस योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सरपंच अंजुम रमजान तडवी यांनी सांगितले. गावात सध्या ब्युटी पार्लर व शिलाई प्रशिक्षण, ग्रामलक्ष्मी, माहेरची साडी अशा योजना सुरु आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.